भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातून एक धक्कादायक बातमीसमोर येत आहे. एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवत गेल्या तीन वर्षापासून अत्याचार केला. त्यानंतर लग्नास नकार देवून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला मारहाण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ तालुक्यातील एका भागात ३८ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. या महिलेची ओळख हार्दीक हेमचंद्र सोनी याच्याशी तीन वर्षांपुर्वी ओळख निर्माण झाली, यावेळी हार्दीक सोनी याने महिलेला लग्नाचे आमिष दखवत वेळोवेळी अत्याचार केला, त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. त्यानंतर त्याने सोबतचे आक्षपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून मारहाण केली. हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने थेट भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी ११ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी हार्दीक हेमचंद्र सोनी याच्या विरोधात पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डीवायएसपी कृष्णांत पिंगळे हे करीत आहे.