रावेर (प्रतिनिधी) लग्न झाले असल्याचे लपवून तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय महिलेसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या एकाविरुद्ध निंभोरा पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रवींद्र विचवे हा पिडीत तरुणीच्या घरात भाडेकरून म्हणून राहत होता. रवींद्रने त्याचे लग्न झाले असल्याचे लपवून पिडीतेसोबत मागील पाच वर्षापासून तर १४ सप्टेंबर २३ पर्यंत वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करत लग्न करतो असे खोटे सांगून एकत्र राहुन पिडीतेची फसवणुक केली. तसेच पिडीतेसह तिच्या मुलांना चापटा बुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे हे करीत आहेत.