मुंबई (वृत्तसंस्था) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून 1 कामगार ठार तर 2 कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. नागपूरकडून 16 व्या उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, या महामार्गावरील 210 किमीच्या पहिल्या टप्प्याचा उद्धाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गाला एकूण 105 कमानी आहेत , त्यापैकी मोठी असलेली 16 व्या क्रमांकाची कमान कोसळून अपघात झाला आहे. या अपघातामुळे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण MSRDC ला पुढे ढकलावं लागलं आहे. या अपघातातील मृत मजूर बिहारचा असल्याची माहिती समजत आहे, मुंबईसह नागपूरपर्यंतच्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनाआधीच मोठी दुर्घटना घडली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लांबणीवर टाकण्यात आले आहे. या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर दोघे जखमी झाले आहेत.
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण 2 मे रोजी करण्याचे नियोजित होते. त्यासाठी महाविकास आघाडी सरकार ते तयारीही सुरू केली होती. नुकतेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सेलुबाजार ते वर्धा जिल्ह्यापर्यंत समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची पाहणीही केली होती. मात्र आता अशी माहिती मिळत आहे की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रक काढले आहे. हा सोहळा किमान दीड ते दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे.