अमळनेर प्रतिनिधी । रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रक ला मोटरसायकलची धडक लागून 33 वर्षीय युवक गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाल्याची घटना 22 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली मात्र रुग्णवाहिकेसाठी 108 क्रमांक लागला नाही म्हणून सुमारे तासाभरानंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगरूळ येथील नितीन अरुण बागुल हा तरुण (दि.22) रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास मेडिकल दुकानावरून काम आटोपून घराकडे निघाला असताना जोरात पाऊस सुरू होता. हॉटेल गारवा जवळ एक ट्रक बंद पडलेला होता. पावसाचे पाणी डोळ्यात जात असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रकाश डोळ्यावर चमकल्याने नितीनच्या मोटरसायकलची धडक उभ्या ट्रकला लागली आणि नितीन जागेवरच कोसळला डोक्याला जबर मार बसला. यावेळी घटना स्थळावर उपस्थिती नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेला कॉल केला, मात्र कोणीही उचतल नसल्याने अखेर पोलिस स्टेशनला फोन लावला.
मंगरूळ येथील दुधाचा व्यवसाय करणारे जगदीश पाटील , राजेंद्र पाटील , अतुल पाटील , सुधाकर पाटील यांच्यासह दोन तरुणांनी नितीनला ओळखले. १०८ ला कॉल लागत नव्हता सारखा सारखा प्रयत्न केला जात होता मात्र १०८ लागत नव्हता अखेर एका तरुणाने पोलीस स्टेशनला फोन लावला बापू साळुंखे नावाच्या हेडकॉन्स्टेबल ने फोन उचलला त्यांनी ही सांगितले की मी १०८ ला लावतो परंतु त्यांचेही प्रयत्न निष्फळ ठरले. मंगरुळचे तरुण आटापिटा करत होते. त्याचवेळी पत्रकार जितेंद्र ठाकूर यांनी मेडिकलचे मालक दिलीप जैन यांना घटना सांगितली.
पत्रकार संजय पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे यांना कॉल करून तातडीने ऍम्ब्युलन्स पाठवण्याची विनंती केली नुकताच रुग्ण घेऊन आलेल्या चालकाला त्यांनी घटनास्थळी पाठवले. परंतु ऍम्ब्युलन्स चालक डिझेल भरायला पंपावर थांबला त्यामुळे ऍम्ब्युलन्सला 30 मिनिटे उशीर झाला तोपर्यंत दिलीप जैन यांनी खाजगी वाहनातून नितीनला दोन खाजगी रुग्णालयात नेले. दोघा डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याने त्याला धुळ्याला न्यायला सांगितले. या साऱ्या क्रियेत एक तासाच्या वर कालावधी उलटला होता. धुळ्याला उपचारासाठी नेताना धुळ्याचे रुग्णालय हाकेच्या अंतरावर असताना नियीन मयत झाला.
वेळीच १०८ क्रमांक लागला असता तर ऑक्सिजन व डॉक्टर उपलब्ध असणारी ऍम्ब्युलन्स अवघ्या 15 मिनिटात उपलब्ध झाली असती आणि नितीनचे प्राण वाचले असते प्रशासनाने १०८ ची व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी होत आहे.