TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर कार्यकर्ते आक्रमक ; राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय फोडले

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सातारा (वृत्तसंस्था) सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक झाली. शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली आहे. शिंदे यांच्या समर्थकांनी संतापाच्या भरामध्ये आपल्याच पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचा आरोप केला जात आहे.

 

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

शशिकांत शिंदेंचा विजय असो अशा घोषणा देण्यात आलेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून ज्यांनी शशिकांत शिंदेंविरोधात या निवडणुकीमध्ये कट रचला, त्याचा निषेध म्हणून आम्ही राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केलीय, असं दगडफेक करणाऱ्या शिंदे समर्थकांनी सांगितलं आहे. आम्ही सर्व राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. आज फक्त एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलल्यात आल्याने आम्ही दगडफेक करुन निषेध करत आहोत, असंही या कार्यकर्त्यांनी सांगितलं.

 

शशिकांत शिंदे यांचा पराभव हा जाणीवपूर्वक पद्धतीने घडवून आणल्याने आम्ही त्याचा निषेध करतोय. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांना जाणीवपूर्वक पद्धतीने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गाफील ठेवलं. शरद पवार आणि अजित पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सूचना करुनही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदे यांना अडचणीत आणलं. जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष वाढवणारा एकमेव नेता आहे. जिल्हाभर फिरुन राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचं काम त्यांनी केलंय. पण काही लोकांना हे रुचत नव्हतं की शशिकांत शिंदे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचं नेतृत्व बनू पाहत आहेत. त्यामुळेच जाणीवपूर्वक हा पराभव घडवून आणल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केलाय.

 

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपाच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील हे आठ मतांनी जिंकले. कराड सोसायटी मतदार संघातून बाळासाहेब पाटील यांनी निवडणूक लढवली होती. तर दुसरीकडे शिवसेनेचे गृह व वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा पाटण सोसायटी मतदार संघातून १४ मतांनी पराभव झाला. शिंदे यांचा पराभव होताना दुसरीकडे खटाव सोसायटी मतदार संघातून बंडखोरी केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गे हे कारागृहात असतानाही निवडून आल्याने हे दोन्ही निकाल खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी धक्कादायक ठरले आहेत. यापूर्वी ११ जागा बिनविरोध झाल्याने दहा जागांसाठी कमालीच्या चुरशीने व संवेदनशीलपणे परवा मतदान झाले होते. त्याची आज साताऱ्यात मतमोजणी सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

शिंदेच्या कार्यकर्त्यांनी असं करायला नको, हार जीत होत असते : खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! अलिशान कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार ; संशयितांमध्ये आमदाराच्या मुलासह पदाधिकारी

June 3, 2022

अरूणाचलप्रदेश भारताचा नाही तर तिबेटचा भाग – चीन

September 9, 2020

८५ लाख रुपये किंमतीच्या रस्त्याच्या कामाचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

July 4, 2021

जळगाव : आंघोळीसाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू !

November 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group