मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नीतू सिंह यांच्यापाठोपाठ अभिनेत्री कृती सेनेनलाही कोरोनाची लागण झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवरुन पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली.
कृती सेनन काही दिवसांपूर्वीच चंदिगढवरुन परतली होती. चंदिगढमध्ये ती आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकणात बीझी होती. या चित्रपटात कृती सेनन अभिनेता राजकुमार रावसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं होतं की, तिच्या चित्रपटाच्या शूटिंगचं रॅपअप झालं आहे आणि ती घरी परतली आहे. दरम्यान, कृती सेननने मुंबईत फोटोग्राफर्सशी बोलताना सांगितलं की, एका सेकंदासाठीही मास्क काढू नका. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनंतर अनलॉकच्या प्रक्रियेत अटी-शर्तींसह शुटींगसाठी परवानगी देण्यात आली. कृती सेननआधी अभिनेता वरुण धवन, नीतू कपूर यांना कोरोनाची लागण झाली होती. दोघेही राज मेहता यांचा चित्रपट ‘जुग जुग जियो’ची शूटींग करत होते. फिल्मफेयरने दिलेल्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाशी निगडीत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील अॅक्टर्स, वरुण धवन, नीतू सिंह यांच्यासह दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, अनिल कपूर आणि कियारा अडवाणी यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. परंतु, त्यांची चाचणी नेगेटिव्ह आली होती.