धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील विविध समस्यांबाबत आज अखिल भारतीय संत सावतामाळी युवक संघटनेच्या वतीने पालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, धरणगाव शहरातील धरणी चौक येथील गटारींना लोखंडी जाळी व पुलास कठडे बसवावेत. कारण या ठिकाणी पावसाळ्यात पाणीवरून वाहत असल्यामुळे बऱ्याचदा गटारी दिसत नाही. यामुळे शाळकरी विद्यार्थी गटारीत वाहून जाण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे एखादं दुर्घटना होण्याच्या अगोदरच पालिकेने तात्काळ समस्या सोडवावी, अशी मागणी निवेदनात आली आहे. या प्रसंगी संघटनेचे विभागीय संघटक विनायक महाजन, जिल्हा संपर्कप्रमुख निलेश माळी, जिल्हा सोशल मिडीया प्रमुख जितेंद्र महाजन, शेतकरी आघाडीचे तालुका अध्यक्ष गजानन भाऊ महाजन, धरणगाव तालुका अध्यक्ष दिनेश महाजन तसेच समाजातील तरुण समाजबांधव उपस्थित होते.