जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचोली येथे आयोजित राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात प्रसिद्ध कीर्तनकार रामायणकार ह.भ.प. रामराव ढोक महाराज यांच्या आजच्या कथेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ह.भ.प.ढोक महाराजांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.
सत्काराला उत्तर देताना ना. पाटील यांनी सांगितले की, राजकारण करत असताना जर अध्यात्माची जोड असली तर सर्वसमावेशक व सकारात्मक राजकारण करता येते. आपल्या कार्यकाळात आपण आपल्या मतदारसंघातील 171 गावापर्यंत कीर्तन सेवेसाठी लागणारे भजनी मंडळाचे साहित्य पोहोचविल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अशा धार्मिक व विधायक कार्यांना आपण यापुढेही अशीच मदत करू असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी चिंचोली येथील सरपंच किरण घुगे, केतन पोळ,अतुल घुगे, संजय घुगे, विजय लाड, सुनील लाड, शरद घुगे, विलास घुगे, मनोज घुगे व परिसरातील ग्रामस्थ व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.