जळगाव ( प्रतिनिधी ) – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहे. येत्या आठवड्यात १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची प्रक्रीया देखील पुर्ण होणार आहे. जळगावसह २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुप्रिम कोर्टात सुनावणी असल्याने लांबणीवर गेल्याने या निवडणुका आता लांबणीवर पडणार आहे. आता फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने त्यांच्यावर देखील प्रशासकराज येणार आहे.
फेब्रुवारीत मुदत संपणाऱ्या ७८३ ग्रामपंचायतींची या महिन्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमला जाणार आहे.प्रशासकांची नेमणूक सीईओ करणार आहे असे ग्रामपंचायत विभागाकडून सांगण्यात येत आहे. विषेशतः पाचोरा तालुक्यातील सर्वाधिक ९६ ग्रामपंचायतींवर प्रशासक येणार आहे. तर भुसावळ तालुक्यातील २६ ग्रा. पवर प्रशासकराज राहिल. या ग्रामपंचायतींवर शक्यतो ग्रामस `वक, व्हीडीओ, विस्तार अधिकारी यांची नियुक्ती होईल असे सांगण्यात येत आहे.
प्रशासक नियुक्तीचे आदेश जारी
ग्रामविकास विभागाने नुकताच यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाआहे. जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे, तिथे निवडणुका न घेता प्रशासक नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १४ ऑगस्ट २०२० च्या शासन निर्णयानुसार ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. ग्रामविकास विभागाच्या अपर सचिवांनी यासंबंधीचे आदेश सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
प्रशासक नेमण्यात येणाऱ्या ग्रा.पं अमळनेरः ६७, भडगाव- ३३, भुसावळ २६, बोदवड- २९, चोपडाः ५३, चाळीसगाव-७२, धरणगाव ४७, एरंडोल ३६, जळगाव ४६, जामनेर-७४ , मुक्ताईनगर- ५०, पाचोरा- ९६ पारोळा-५८, रावेर ४८, यावल ४८















