जळगाव (प्रतिनिधी) ठाणे येथे झालेल्या स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव डिस्ट्रिक्ट या जिल्हा संघटनेला संलग्नता देण्यात आली आहे. या संघटनेच्या अध्यक्ष रेवती नगरकर असून सचिव फारुक शेख हे आहेत.
राज्य संघटनेचे सचिव झुबिन अमेरीया यांनी जळगाव च्या स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव डिस्ट्रिक्टचे सचिव फारूक शेख यांना हे सलग्नता प्रमाण पत्र सुपूर्द केले तेव्हा जळगाव चे कोच व पदाधिकारी कमलेश नगरकर सुद्धा उपस्थित होते. स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राला ३३ पैकी २८ जिल्हे संलग्न असून या महाराष्ट्र स्विमिंग असोसिएशनला स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया व त महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची सुद्धा मान्यता आहे.
अनधिकृत संघटनेच्या स्पर्धेत खेळू नका – फारूक शेख
जिल्हा संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी पत्रकाद्वारे जिल्ह्यातील सर्व पालक, मंडळ, शाळा, स्विमिंग टॅंक च्या पदाधिकारी यांना आवाहन केले आहे की, अनधिकृत संघटनेच्या बॅनर खाली होणाऱ्या स्पर्धेत आपल्या खेळाडूंना पाल्यांना भाग घेऊ देऊ नका अन्यथा त्यांना मान्यताप्राप्त संघटनेत खेळता येणार नाही व त्याच्या नुकसानीस संबंधित शाळा महाविद्यालय व पालक जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असे आव्हान शेख यांनी केले आहे.















