जळगाव (प्रतिनिधी) आंदोलनानंतर प्रभाक क्र. ८ मधील द्वारकानगर वासीयांची तब्बल १५ वर्षानंतर पाण्यासाठीची तळमळ आता थांबली आहे. आपल्या घराघरात महानगरपालिकाचे पाणी येईल ह्या विचाराने व परिसरात पाईपलाईनचे काम सुरू होताच द्वारकानगर वासीयांच्या आनंदाला उधाण आले.
काल रोजी द्वारकानगर वासीयांनी डोक्यावर हंडे घेऊन केलेल्या आंदोलनाचा शेवट गोड झाला. प्रभाक क्र. ८ मधील द्वारकानगर वासी मागील 15 वर्षांपासून महानगरपालिका च्या पाण्यासाठी मागणी करत होते, पण त्यांच्याकडे कुणीही अधिकार किंवा नगरसेवक लक्ष देत नव्हते, शेवटी त्यांनी सोशल मिडिया व प्रसार माध्यमांची मदत घेत कुंदन सुर्यवंशी व श्रीराम नगर तरुण मित्र मंडळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात केली.
परिसरातील सर्व महिलांनी डोक्यावर हंडे घेत थेट महापौरांकडे पाण्यासाठी साकळे घातले व त्या आंदोलनाला सर्व प्रसार माध्यमांचे सहकार्य लाभल्यामुळे संबंधित अधिकारी वर्ग झोपेतून जागी झाले व त्वरीत पाण्याची पाईपलाईन टाकण्यास सुरुवात केली.
तब्बल १५ वर्षांनंतर आपल्या घराघरात महानगरपालिकाचे पाणी येईल ह्या विचाराने व परिसरात पाईपलाईनचे काम सुरू होताच द्वारकानगर वासीयांच्या आनंदाला उधाण आले व संपूर्ण द्वारकानगर वासीयांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे कुंदन सूर्यवंशी व त्याना मदत करणारे अँड. कुणाल पवार त्यांच्या संकल्पना व खास करून लोकमतचे आभार मानले.
















