जळगाव (प्रतिनिधी) शिंदखेडा तालुक्यातील वालखेडाजवळ अमळनेर डेपोची बस सोनगिरहून अमळनेर येथे येत असतांना आज दुपारी प्रवासी रिक्षाने कट मारल्याने भरधाव बस पलटी झाली. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक असे की, अमळनेर डेपोची बस क्रमांक (एमएच २० बीएल १४१८) ही सोनगिरहून अमळनेर येथे येत असतांना शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा गावाजवळून आज रविवारी २४ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या प्रवाशी रिक्षाने कट मारला. रिक्षाला वाचविण्याच्या नादात बस रोडच्या बाजूला जावून पलटी झाली. यात वाहक संदीप लोहार यांच्यासह पवार कुटुंबातील दोन जण हे किरकोळ मजूर जखमी झाले. अपघातीची माहिती शिंदखेड आगारला देण्यात आली. जखमी प्रवाशांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रवाना केले. या प्रकरणी नरडाणा पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करण्याचे काम सुरू होते.