धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भिल्ल समाजाची तालुका बैठक नुकतीच संपन्न झाली.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांनी आश्वासन दिले होते की, तुमच्या सर्वांना रेशन कार्ड मिळेल व आपल्याला घरकुलचा सुद्धा लाभ मिळेल. दिनांक 6 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयामध्ये पुरवठा अधिकारी संदीप मोरे यांच्याशी या संदर्भात पी एम पाटील सर व एकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष मोरे बापू व वंचित लाभार्थी यांची चर्चा झाली. 8 दिवसाच्या आत यावर मार्ग काढण्याचे पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर विस्तार अधिकारी यांची बैठक लावून घरकुलचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे, अशीही माहिती माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांनी दिली.