जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नेरी नाका परिसरातील स्मशानभूमीतील अंत्यविधी क्रियेसाठीचे बारा कठडे, ओटे तसेच परिसराची दुरवस्था झाल्याचे दिसत आहे. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे संबंधित कठडे, ओटे तसेच परिसराची महापालिकेच्या माध्यमातून लवकरात लवकर दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांनी दिले.
जळगाव जिल्हा विश्व हिंदू परिषद सेवा विभागाच्या पदाधिकार्यांनी काल सोमवार, दि. २४ जानेवारी २०२२ रोजी महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांची भेट घेऊन बारा कठडे, ओटे तसेच परिसराची दुरवस्था झाल्याने त्यांच्या दुरुस्तीसंदर्भात निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यावर या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन आज मंगळवार, दि. २५ जानेवारी २०२२ रोजी महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी नेरी नाका परिसरातील स्मशानभूमीतील अंत्यविधी क्रियेसाठीचे जीर्ण झालेले बारा कठडे, ओटे तसेच परिसराच्या दुरवस्थेचीही प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जळगाव जिल्हा विश्व हिंदू परिषद सेवा विभागाचे जिल्हा सेवाप्रमुख डॉ.हितेंद्र गायकवाड, जिल्हा सह सेवाप्रमुख दीपक दाभाडे, जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार, महानगर सेवाप्रमुख बापू माळी, महानगर सेवाप्रमुख तुषार साळुंखे, महानगरमंत्री बंटी बाविस्कर, जिल्हा गोरक्षाप्रमुख मनोजभाऊ चौधरी, महानगर मठ, मंदिरप्रमुख किसनभाऊ मेधे यांच्याशी चर्चा करून त्यांना आश्वस्त केले तसेच याचवेळी संबंधित कामे लवकरात लवकर करण्यासंदर्भात महापालिका अधिकार्यांना सूचनाही केली.
















