जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत २७ लाख ६९ हजार रुपये भ्रष्टाचार झाला असल्याबाबत ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी व जेष्ठ नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना भेट घेऊन माहिती दिली आहे. तसेच, दोषी सदस्यांवर व ग्रामसेवकांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीमध्ये निवडुन आलेले १७ कार्यकारी सभासद आहेत. सत्ताधारी सभासदांनी व ग्रामसेवक यांनी एकमत करुन पंधराव्या वित्त आयोगातून रक्कम काढून भ्रष्टाचार केलेला आहे. शिरसोली प्र.न. शिवार, नायगांव धरणावरील सोलर ७ लाखाचे व त्यातील पंप २ लाखाचा असे एकूण ९ लाख रुपये भ्रष्टाचार झाला आहे. सत्ताधा-यांनी बँकेतून काढलेले पैसे शिक्षणासाठी ५ लाख रुपये तसेच कौशल्य विकासासाठी ०३ लाख रुपये, शिबीरसाठी १० लाख ६९ हजार रुपये असे १८ लाख ६९ हजार रुपये अशा प्रकारे भ्रष्टाचार केलेला आहे. वरील सर्व एकूण भ्रष्टाचार २७ लाख ६९ हजार रुपये झालेला आहे.
तरी, भ्रष्टाचार करणाऱ्या सदस्यांवर, ग्रामसेवकांवर कारवाई करावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर भगवान दगा पाटील, जमुनाबाई देविदास साबळे, सुरेखा बापू मराठे, शारदाबाई अनिल पाटील, मिना पांडुरंग बोबडे, जोत्सना अनिल पाटील या सदस्यांसह विठ्ठल माळी, संजय पाटील, प्रताप बोबडे, शरद बोबडे, वसंत फुसे, यशवंत बारी, वसंत मराठे, पुनमचंद माळी, बापू मराठे, देवराम बारी, कैलास बारी, पंढरीनाथ खेते, अनिल मराठे, वसंत वाणी, निवृत्ती अस्वार, निवृत्ती शिंपी, गणेश बारी आदी नागरिकांच्या सह्या आहेत.
दरम्यान, ग्रामसेवक चिंचोरे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की, टेंडर प्रक्रियेनुसार रीतसर कामे झाली आहेत. कामात अनियमितता नाहीत. निवेदनात जे म्हणणे आहे, त्यात कुठलेच तथ्य नाही, असे त्यांनी सांगितले.