अमळनेर प्रतिनिधी । कोरोनाच सावट सर्वदूर सुरू असून, त्यापासून बचाव करायचा असेल तर स्वच्छता व आरोग्य दुर्लक्षित करून चालणार नाही, याचाच एक भाग म्हणून अमळनेर नगरपरीषदेने मोकाट जनावरे व डुकरांच्या मालकांना नोटीस पाठवली आहे.
सदर नोटीसीत संबंधीत जनावरे व डुक्कर मालकांना कळविण्यात आले आहे की, अमळनेर शहर नागरी क्षेत्रात कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोरोना, स्वाइन फ्लू सह विविध साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव हा आपल्या मोकाट सोडलेल्या गुरे-ढोरे,कुत्रे आणि डुक्करे यामुळे होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे.या बाबत आपणास आधीही नोटीस देण्यात आलेली आहे.परंतु आपण अद्यापपर्यंत डुक्करे शहराबाहेर हलवली नाही.त्यामुळे नागरीभागात मोकाट डुक्करे आढळून आलेली आहेत.शहरात या जनावरांच्या वावरामुळे दुर्गंधी तसेच रस्त्यात अडथळा निर्मात होत असतो, साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे.
आपल्या मालकीची सदरची मोकाट जनावरे व डुक्करे ही नोटिस मिळाल्यापासून ७ दिवसाच्या आत ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावावी, अशी जनावरे तदनंतर देखील शहरात आढळून आल्यास आपल्या विरुद्ध महाराष्ट्र नगरपरिषद, व औद्योगिक अधिनियम १९६५ च्या कलम २३७ ,२४५ ,२४६, २४८ आणि कलम २९३ व २९४ भारतीय दंडसंहितेचे कलम २६८, २६९,२७०,२८९,२९०,२९१ तथा मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ४५ व ९० अ च्या तरतुदीनुसार फौजदारी पात्र कार्यावही करण्यात येईल तसेच सदर जनावरांची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे नोटीसीत म्हटले आहे.
नोटीस ही खालील जनावरे व डुक्कर मालकांना दिलेली आहे.
कमल मुनीर फतरोड(ताडेपुरा), लखन मनोज कलोसे, आकाश संजय धाप, अक्षय भगवान कलोसे(मेहतर कॉलनी गांधलीपुरा), कालु शंकर लोहेरे(राममंदिराजवळ गांधलीपुरा), राजेश टिल्लू जाधव(झामी चौक), ठाकूर मुनिर फतरोड(ताडेपुरा), किशोर वजीर जाधव(शिवकॉलनी), नरेश कालु कल्याणे(राममंदिराजवळ गांधलीपुरा) यांना नोटीस बजावलेली आहे.