अमळनेर (प्रतिनिधी) आठ वर्षांच्या मुलीला विहिरीत ढकलून विवाहितेने स्वतःही विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ४ रोजी कळमसरे निम रस्त्यावर वीज उपकेंद्राजवळ घडली.
निम येथील समाधान जहांगीर कोळी याची पत्नी जयश्री समाधान कोळी (३०) व मुलगी नंदिनी समाधान कोळी (८) हिने भाकचंद जैन यांचा शेताच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. जयश्री ही दुपारी ३ वाजता कळमसरे बसस्टँडवर मुलीला घेऊन बसली होती. मुलीला बिस्कीट व पाणीची बाटली घेऊन ती पायी निम गावाकडे रस्त्याने निघाली आणि नंतर आत्महत्या केली. जयश्रीचा पती समाधान जहागीर कोळी हा मोलमजुरी करायचा. जयश्रीची सासू हिराबाई कोळी ही आज सप्तशृंगी गडावर देवदर्शनासाठी गेली होती. तर जयश्रीचा ४ वर्षांचा मुलगा मामाकडे जैनाबाद (जळगाव) येथे इंग्लिश मीडियमला शिकत असतो.