अमळनेर (प्रतिनिधी) बिल्डींग मटेरीयल सप्लायरकडून दीड लाखांची लाच स्वीकारतांना अमळनेर तलाठी आणि मंडळ अधिकारीला आज एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. गणेश राजाराम महाजन (वय-४६ वर्ष, व्यवसाय-नोकरी, तलाठी, अमळनेर शहर. रा.नविन बस स्टॅण्डजवळ, पाळधी, ता.धरणगाव) आणि दिनेश शामराव सोनवणे (वय-४८ वर्षे, व्यवसाय-नोकरी, मंडळ अधिकारी,अमळनेर रा.फरशी रोड,अमळनेर), असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
या संदर्भात अधिक असे की, तक्रारदार यांचा अमळनेर शहरात व अमळनेर तालुक्यात बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायासाठी त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे 3 डंपर आहेत व करारनामा तत्वावर विकत घेतलेले 3 डंपर आहेत. त्यापैकी करारनामा तत्वावर विकत घेतलेले डंपर (क्रं.MH18 AA 1153) हे अमळनेर शहरात माती वाहतूक करतांना सुमारे 2 महिन्यापूर्वी तहसिल कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आले होते. सदरचे डंपरवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे तलाठी गणेश महाजन आणि मंडळ अधिकारी दिनेश सोनवणे यांनी पंचासमक्ष दीड लाखांच्या लाचेची मागणी केली. यानंतर सदर रक्कम तलाठी गणेश महाजन यांना स्विकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.
हि कारवाई शशिकांत एस.पाटील (पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.बाळु मराठे, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी यांनी केली.