चाळीसगाव (प्रतिनिधी) पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करून चाळीसगाव तालुक्यातील १०,००० पूरग्रस्तांना पुरतील एवढ्या सर्व प्रकारच्या औषधी, TT धनुर्वात इंजेक्शन, तज्ञ डाॕक्टर, अत्यावश्यक सेवेसाठी अद्ययावत ४ रूग्णवाहिका असे एकुण ४ पथक रवाना करण्यात आले.
शिवसेना नेते, विधीमंडळ गटनेते तथा राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतुन, बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व खा. डाॕ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश जी चिवटे यांच्या मार्गर्शनाखाली चाळीसगाव शहरासह मुंदखेडा खु, मुदखेडा बु, एकलहरे, वाघळी, बोरखेडा खु, वाकडी, रोकडे, बाणगांव,वाघडू, खेर्डे या गावांमध्ये मोठ्याप्रमाणावर पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरस्थितीमुळे साथ रोग पसरू नये व सध्या सुरू असलेला कोरोना प्रादुर्भाव पसरू नये म्हणुन दक्षतेसाठी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी तहसिलदार, गटविकासअधिकारी, मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकक्षक, वैद्यकीय अधिकारी यांचेशी पुरग्रस्त भागाची माहीती घेवून चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली. अमोल पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पारोळा यांच्या शुभहस्ते उद्घाटन करून १०,००० लोकांना पुरतील एवढ्या सर्व प्रकारच्या औषधी, TT धनुर्वात इंजेक्शन, तज्ञ डाॕक्टर, अत्यावश्यक सेवेसाठी अद्ययावत ४ रूग्णवाहिका असे एकुण ४ पथक रवाना करण्यात आले.
यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश जी चिवटे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख योगेश म्हस्के, कराड तालुका समन्वयक महेश पाटील, पुणे समन्वयक राजाभाऊ बिलारे, वैद्यकीय सहाय्यक स्वरूप काकडे, चाळीसगाव तालुका समन्वयक हर्षल अनिल माळी, सभापती महेंद्र बापू पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख नानासाहेब खलाने, तालुका प्रमुख रमेश आबा चव्हाण, शहर प्रमुख नाना कुमावत, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, महिला आघाडी प्रतिभा ताई पाटील, अनिता ताई शिंदे, संदीप शिरुडे, डॉ. संदीप देशमुख, सुचित्रा ताई राजपूत, सोमनाथ माळी, राहुल वाकलकर, रोशन जाधव,अमोल चौधरी, धुळे उपजिल्हा प्रमुख राज माळी, धुळे शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष अध्यक्ष महावीर जैन, युवासेना तालुका प्रमुख सागर पाटील, युवासेना शहर सरचिटणीस शुभम राठोड, महेंद्र कुमावत, मुराद पटेल, वसीम चेरमन, नकुल पाटील, रघुनाथ कोळी, आकाश पोळ, अजय पाटील, रोशन चव्हाण, हर्षल बोरसे, तुषार सोनवणे, ऋतिक पाटील, दर्शन अहिरे, अक्षय चौधरी, प्रितेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच डॉ. राहुल पाटील, डॉ. जयेश जैन, डॉ. पियूष जैन, डॉ. प्रशिक उमरे, डॉ. मनीषा मारकड, डॉ. रुचिता पाटील, डॉ. साक्षत्रा सूर्यवंशी, डॉ. पूजा सांगडे यांचे सहकार्य लाभले.