पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील दळवेल गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने दुचाकीस दिलेल्या धडकेत धरणगाव तालुक्यातील वराड येथील ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दि. ३ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. समाधान उर्फ सरदार बंडू शिंदे, असे मयताचं नाव आहे.
याबाबत वराड येथील शांताराम बंडू शिंदे यांनी पारोळा दिली. पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, त्यांचे मोठे बंधू समाधान उर्फ सरदार बंडू शिंदे हे अंत्यविधीसाठी आपल्या दुचाकीने नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे गेले होते. अंत्यविधी झाल्यानंतर ते घरी वराडकडे येत असताना दळवेलजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर रात्री ११ वाजेच्या सुमारास पाठीमागून धुळ्याकडून पारोळ्याकडेस येणारी अशोक लेलँड कंपनीचा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात समाधान शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी कजगाव येथील ट्रक चालक ज्ञानेश्वर दला तांबे (वय ४९ ) यांच्याविरोधात पारोळा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आहे. दरम्यान, अपघातानंतर रात्री रुग्णवाहिका चालक शरद पाटील यांनी समाधान शिंदे यांना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले होते.















