एरंडोल (प्रतिनिधी) ६५ वर्षीय वृद्ध महिलेस जातीवाचक शिवीगाळ, विनयभंग करत केली मारहाण केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तम शिवराम शिरवनी असे संशयित आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, ६ डिसेंबर रोजी पिडीत वृद्ध महिलेने उत्तम शिरवनीकडे घराची चाबी मागितली. या कारणावरून त्याने पिडीत महिलेला लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच पिडीतेने विरोध केला असता हात धरून तिच्या मनास लज्जा उत्त्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे करीत आहेत.