कासोदा (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या तळई येथील एका अधिकाऱ्याला अनोळखी व्यक्तीने फोनद्वारे एनी डेस्क अप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून तब्बल ९८ हजार ९७६ रुपयाची फसवणूक केली आहे.या प्रकरणी कासोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील तळई या गावातील सागर उत्तमराव पाटील(वय ३०, आरोग्य अधिकारी प्राथमिक केद्र तळई) यांच्या मोबाईलवर दि २८ रोजी एका अनोळखी व्यक्तीचा ९८७२७५१६४४ व अन्य एका नंबरहून फोन आला. त्या व्यक्तीने सागर पाटील यांना एनी डेस्क अप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगत पुढील कोड विचारून प्रथम ५० हजार रुपये नंतर ४८,९७६ असा एकूण ९८,९७६ रुपये खात्यातून परस्पर वर्ग करून घेतले. या प्रकरणी सागर पाटील यांनी दि ९ रोजी कासोदा पोलिसात अनोळखी नंबर धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नी. अशोक उत्तेकर हे करीत आहेत.