धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत जळगाव रोडवरील संताजी तेलघाना ते रेल्वे रूट दरम्यान आज एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान,ओळख पटविण्याचे आवाहन धरणगाव पोलिसांनी केले आहे.
या संदर्भात अधिक असे की, अजय साहेबराव मैराळे (रा.धरणगाव) यांनी पोलिसात माहिती दिली की, आज दिनांक 31डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास धरणगाव शिवारात जळगाव रोडलगत संताजी तेलघाना ते रेल्वे रूट दरम्यान एक अनोळखी इसम मयत अवस्थेत मिळून आला. तरी आपल्या गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी मदत करावी असे आवाहन, धरणगाव पोलिसांनी केले आहे.
मयत व्यक्तीचे वर्णन काळ्या रंगाचे स्वेटर, लाल रंगाचे लांब बाह्यांचे शर्ट, पिवळ्या रंगाची मळकट लुंगी. सफेद रंगाची दाढी वाढलेली, सफेद रंगाचे डोक्यावरील केस वाढलेले, अशा प्रकारचे आहे. मृतदेहाची ओळख पटल्यास धरणगाव पोलीसांशी 02588251333 या क्रमांकारवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत पोलीस स्थानकात अजय मैराळे यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 117/2022 Cr.P C 174 प्रमाणे नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनी जिभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे कॉ. नाना ठाकरे, स.फौ. रामदास पावरा हे करीत आहेत.
















