जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसोलीजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच झाल्याची घटना आज घडली. संतोष रमेश पाटील (वय ३६, रा. गोंडगाव ता. भडगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, संतोष पाटील हा नातेवाईकांसह जळगावला एका अंत्यविधीसाठी आलेला होता. अंत्यविधी आटोपल्यानंतर सर्वजण आज पुन्हा भडगाव येथे जाण्यासाठी निघाला. संतोष दुचाकीवर होता तर काही नातेवाईक क्रूझर गाडीने पुढे निघाले होते. शिरसोली जवळ अचानक अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील संतोष पाटील जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच शिरसोली येथील काही नागरिकांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संतोषला मयत घोषित केले.
















