चोपडा (प्रतिनिधी) शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये बोगस शिक्षक भरती केल्याप्रकरणी शाळेच्या तीन संचालकांसह एका शिक्षकावर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत चिरागोद्दिन इजाबोद्दिन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सन २०१२ मध्ये शाळा अध्यक्ष व समितीने ७ शिक्षकांची भरती केली होती. त्यात अजहरोद्दीन जहिरोद्दीन व इतर-६ शिक्षकांचा समावेश होता. त्यानंतर पुन्हा संबंधितांनी सन २०१४ मध्ये शिक्षक भरती केली. त्यावेळीही इतर ४ शिक्षकांची भरती करण्यात आली होती. सदर भरती ता. १६ जून २०१४ पासून संबंधित शे.मोहसीन शे. हशम यांनी भरती बाबत खोटे कागदपत्रे तयार करुन दि.२४ डिसेंबर २०१२ पासून भरती केल्याचे खोटे दर्शविले व खोटे दस्तएवजाचे आधारे संशयितांनी शे.मोहसीन शे.हशम यांची शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांची मान्यता घेतली आहे. संशयितांनी संगणमताने लबाडिने व बेईमानीने खोटे दस्तएवज तयार केले आहे. त्यामुळे सरकारचे नुकसान करत त्यांची अंमलबजावणी केली आहे. तसेच बनावट दस्तएवजांचा वाईट हेतुने सरकारला फसवण्यासाठी उपयोग केला आहे.
एवढेच नव्हे तर, बनावट दस्ताची जाणीव असतांना हेतुपूर्वक शिक्षण अधिकारी यांच्याकडे देवुन शे.मोहसीन शे.हशम यांची मान्यता मिळविली. सदर संशयितांनी जा.क्र.१२४/२०१२-२०१३चे नियुक्ती पत्र अजोहरोद्दीन जहीरोद्दीन यास दिले होते व त्याच जावक क्रमांकाने पुन्हा शेख मोहसिन शे. हषम यास नियुक्ती पत्र दिले आहे. या खोट्या दस्तएवजाचे आधारे शिक्षणअधिकारी जळगाव यांच्याकडून दि.२७ ऑगस्ट २०१४ रोजी खोटे दस्त सादर करुन मान्यता घेतली आहे.
या प्रकरणी मुस्तफा इजुकेशन सोसायटी चोपडा संचालित मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल येथे स्वयंघोषित अध्यक्ष असगरअली सैय्यद, अब्दुल सत्तार एनोद्दिन,लियाकतअली सैय्यद नुर या तीन संचालकांसह शिक्षक शे.मोहसीन शे. हसम यांनी संगनमताने बनावट दस्तावेज तयार करून शिक्षक भरती केल्याप्रकरणी कोर्टाने दि.१५ जुलै २०२३ आदेशाने भादवी कलम ४६३,४६४,४६५,४६८, व ४७१ सी.आर पी.सी.कलम १५६(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चोपडा पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी.संतोष चव्हाण हे करत आहे.
















