भुसावळ (प्रतिनिधी) येथील एका महिलेकडून ६० लाख ७० हजार रुपये घेऊन गाळे खरेदीस टाळाटाळ केल्याप्रकरणी भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनानुसार ही रक्कम न्यायालयात जमा केली आहे. यानंतर त्यांना या प्रकरणात दोन आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी एका महिलेकडून ६० लाख ७० हजार रूपये घेऊन गाळे खरेदीस टाळाटाळ केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ही रक्कम न्यायालयात जमा केली आहे. यानंतर त्यांना या प्रकरणात अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ येथील महिलेची ६० लाख ७० हजार रुपये आरटीजीएसद्वारे घेऊन गाळे खरेदी करून न देता फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळ येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी यांचेवर बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे कलम ४२०, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. दि. २६ एप्रिल रोजी न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या न्यायासनासमोर झालेल्या सुनावणीत चौधरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
त्यानंतर अनिल चौधरी यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी दि. २१ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्पष्ट मत नोंदवले की, सदर प्रकरणात असलेली वस्तुस्थिती व उच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण पाहता तुम्ही आधी १९ ऑक्टोबर २०११ रोजी घेतलेली संपूर्ण रक्कम ६० लाख ७० हजार रुपये संबंधित दिवाणी न्यायालयात दि. २४ मे पर्यंत जमा करा.