धुळे (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे (Anil Gote) यांनी तत्कालीन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारला दाऊद संबंधित कंपनीकडून देणगी मिळाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी गोटेंनी सक्त वसुली संचालनालयाकडे (ED) तक्रार दाखल केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर सन २०१४-१५ मध्ये कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात असलेला देशद्रोही व १९९३ च्या मुंबई बाॅम्बब्लास्ट खटल्यातील मुख्य आरोपी इक्बाल मिरचीशी संबंधित असलेल्या RKW Developers Pvt Ltd म्हणजेच पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी व सध्या तुरुंगात असलेल्या राकेश वाधवान याच्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बॅंक खात्यातून १० कोटी रूपये भारतीय जनता पक्षाने देणगी?, खंडणी गोळा केल्याबाबतची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी आज ईडीच्या मुंबई कार्यालयात दाखल केली आहे.
















