नशिराबाद (प्रतिनिधी) येथे भ्रष्टाचार विरोधी मोर्चा (दिल्ली) या संघटनेची नुकतीच बैठक सपंन्न झाली. या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुल गंगावने हे होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी अनिल रणधीर व तालुका संपर्क प्रमुखपदी सुनील माळी यांची निवड करण्यात आली.
या बैठकीत सुनील ब्राह्मणे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष तसेच महिला प्रदेश सदस्य वैशाली विसपुते, रविंद्र साळवे, जिल्हा संपर्कप्रमुख, सांडू पहेलवान जिल्हा सचिव, महिला कविता सपकाळे जिल्हा संपर्कप्रमुख, प्रतिभा रोटे नाशिराबाद शहरध्यक्ष, विनोद विसपुते, तालुका अध्यक्ष जळगाव, नूतन जिल्हा उपाध्यक्ष अनिल रणधीर, व सुनील माळी तालुकासंपर्क प्रमुख जळगाव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची सुद्धा निवड करण्यात आली आहे.