जळगाव (प्रतिनिधी) तब्बल ८ वर्षांपासून एका २२ वर्षीय मुलीवर अत्याचार होत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. एवढेच नाही दोन तरुणींनी तर घरातून पैसे चोरून आण नाहीतर तुझे फोटो व्हायरल करू अशी धमकी या पीडित तरुणीला दिली. तसेच आरोपीने तरुणीवर अत्याचार करून तिची सोन्याची चैनही जबरदस्ती घेऊन घेतली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, ८ वर्षांपासून ते आज पावेतो वेळोवेळी रितेश सुनील बाविस्कर (रा. जुना सातारा, भुसावळ) याने तरुणीही १४ असताना ती अल्पवयीन आहे. हे त्यास माहीती असतांना देखील, तरुणी व तीच्या मैत्रीणी यांचे शाळेत केव्हातरी फोटो काढुन, ते समाजात व शाळेत व्हायरल करेल अशी धमकी देऊन, तरुणीस त्याचे मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवुन त्याच मोटारसायकलवर बंटी (पूर्ण नाव माहित नाही रा.भुसावळ) व राहुल (पूर्ण नाव माहित नाही रा.भुसावळ) यांना बसवुन घेउन इंजीनघाट परीसरात घेऊन जाऊन तरुणीसोबत शारीरीक संबंध प्रस्थापीत केले. तसेच तरुणीच्या उजवे हातातील बोटातील सोन्याची अंगठी व २०० रूपये तसेच डावे हातातील बोटातील सोन्याची अंगठी बळजबरीने काढुन घेतले. तसेच दोन महिला (रा. टिटवाळा,मुंबई) यांनी तरुणीस तु तुझे घरातुन पैसे चोरून आण नाहीतर तुझे फोटो व्हायरल करू अशी धमकी दिली. तर उर्वेश पाटील (रा. भुसावळ) याने संशयित आरोपी महिलेशी संगणमत करून तिच्या लग्नासाठी ५० ते ६० हजाराची मागणी केली. पीडित तरुणीने घाबरून ५० हजार रुपये त्यांना दिले. रितेश सुनील बाविस्कर याने तरुणीसोबत वेळोवेळी शारीरीक संबधं प्रस्थापीत करून, तीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तरुणीची ७ ग्रॅम सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली.
याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात रितेश सुनील बाविस्कर (रा. जुना सातारा, भुसावळ), दोन महिला (रा. टिटवाळा, मुंबई), सुनील बाविस्कर (रा. खायवाडी जुना सातारा भुसावळ), उर्वेश पाटील (रा. भुसावळ), बंटी (पूर्ण नाव माहित नाही रा.भुसावळ), राहुल (पूर्ण नाव माहित नाही रा.भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास अरुण सोनार हे करीत आहेत.
















