TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक ! कोरोना उपचारांच्या नावाखाली सेक्स रॅकेटचं जाळं ; पीडीतेवर ६ महिने बलात्कार, ५४ जण ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

गुंटूर (वृत्तसंस्था) आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh Crime News) गुंटूर (guntur) येथे नुकताच एक संपातजनक प्रकार उघडकीस आला आहे. कोविडवरील (Covid-19) उपचारांच्या नावाखाली या मुलीला एका नर्सने आपल्या घरी नेलं होतं, नंतर तिच्यावर देह विक्री  करण्याची बळजबरी करण्यात आली. या काळात तीन सेक्स रॅकेटमध्ये या मुलीचा वेश्या व्यवसायासाठी वापर झाल्याचं उघडकीस आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी नर्स स्वर्णकुमारीसह ५४ जणांना अटक केली आहे.

 

READ ALSO

पाच मोटरसायकलींची चोरी

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

या प्रकरणाची सुरुवात झाली ती गुंटूरमध्ये. आठवीत शिकणाऱ्या या आईविना मुलीला कोविड-१९ ची लागण झाल्यानं २६ जून २०२१ रोजी गुंटूरच्या शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी रुग्णालयातील स्वर्ण कुमारी नावाच्या एका महिलेने आपण नर्स असल्याचं सांगत या मुलीच्या वडिलांना विश्वासात घेतलं आणि चांगल्या उपचारांसाठी, देखभालीची हमी देत तिला आपल्या घरी घेऊन जाण्याची परवानगी मागितली. मुलीचे वडील मजूरी करतात. त्यानुसार ती नर्स या मुलीला आपल्या घरी घेऊन गेली आणि काही दिवसांनंतर तिनं या मुलीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं.

 

त्या कथित नर्सन या मुलीला नेल्लोर, विजयवाडा, ओंगोल तसंच हैदराबाद अशा ठिकाणी नेलं, तिथं अनेक पुरुषांनी तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, या काळात आपली मुलगी नर्सच्या घरी सुरक्षित आहे,असंच या मुलीच्या वडिलांना वाटत होतं. त्यांना खरं कळू नये यासाठी स्वर्णकुमारी या मुलीला स्वतःच्या देखरेखीखालीच वडिलांशी फोनवर बोलू देत असे. दरम्यान, दोन महिने हा छळ सोसल्यानंतर या मुलीनं त्या नर्सच्या तावडीतून पळून जाण्यात यश मिळवलं आणि ती विजयवाडा इथं पोहोचली. तेव्हा स्वर्ण कुमारीनं मुलीच्या वडिलांना ती बेपत्ता झाल्याची माहिती दिली आणि गुंटूरमधील नल्लापाडू पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल केल्याचं सांगितलं. तक्रार करूनही ही मुलगी सापडली नाही.

 

या मुलीच्या दुर्दैवानं अद्याप तिची पाठ सोडली नव्हती. विजयवाडा इथं बसस्थानकावर घाबरून एकटीच बसलेल्या या मुलीला वेश्या व्यवसायातील दलाली करणाऱ्या एका महिलेनं हेरलं आणि गोड बोलून ती तिला आपल्या घरी घेऊन गेली. या महिलेनं ही काकिनाडा, तनुकू अशा अनेक ठिकाणी नेऊन अनेक पुरुषांशी तिचा सौदा केला. या मुलीला वेश्याव्यवसायासाठी बळजबरीनं एका ठिकाणाहून दुसरीकडे नेलं जात असताना जससिंथा आणि तिची मुलगी हेमलता या मायलेकींच्या जोडीच्या संपर्कात ही मुलगी आली. तिला मदत करण्याच्या बहाण्यानं या दोघींनी तिच्याकडून सगळी माहिती गोळा केली आणि तिचा सौदा करणाऱ्या लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळले. या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे.

 

या मुलीला कायमस्वरूपी देहविक्रय करण्यास भाग पाडण्याच्या उद्देशाने ही जोडी मुलीच्या शाळेत ट्रान्सफर सर्टिफिकेट (TC) मिळविण्यासाठी गेली. जेणेकरून या मुलीला त्या आपल्याजवळ ठेवू शकतील. मात्र शाळा व्यवस्थापनाला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला आणि त्यांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. तेव्हा या दोघीनी मुलीच्या वडिलांकडे जाऊन त्यांना त्यांच्या मुलीची अवस्था सांगितली. मुलीच्या वडिलांना आपली ओळख बाल कल्याण विभागातील अधिकारी म्हणून करून देत या दोघींनी वडिलांनीच मुलीला देह विक्रय करण्यास भाग पाडल्याची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. तेव्हा घाबरलेल्या वडिलांनी मुलीच्या शाळेत ट्रान्सफर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला आणि ते त्यांच्या हवाली केलं.

 

त्यानंतर या मायलेकी अनेक पुरुषांबरोबर या मुलीचा सौदा करू लागल्या. त्यानंतर या मुलीनं दोन दिवसात त्यांच्या तावडीतून पळून जाण्यात यश मिळवलं आणि १८ डिसेंबर २०२१ रोजी ती आपल्या घरी पोहोचली. तिनं आपल्या वडिलांना सर्व कहाणी सांगितली. तेव्हा त्यांनी मेडिकोंडुरू पोलिसांशी संपर्क साधला. १८ डिसेंबर रोजीच पोलिसांनी शून्य एफआयआर दाखल केला आणि हे प्रकरण तपासासाठी अरुंदलपेट पोलिसांकडे हस्तांतरित केलं.

 

दरम्यान, या मुलीला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गुंटूर शहर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत, तपासासाठी विशेष पथकं तयार केली आणि ५४ जणांना अटक केली. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली तसंच अवैध तस्करी (प्रतिबंध) कायदा आणि पोस्को कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले.

 

आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात गुंतलेल्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचा आमचा निर्धार आहे. या सर्वांना अटक करण्यासाठी आम्ही आवश्यक ती सर्व कारवाई करत आहोत, असे तपास अधिकारी डीएसपी के. सुप्रजा यांनी टीएनआयईला सांगितलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
Next Post

धरणगाव येथे जि.प.प्रा.मराठी शाळेत गणवेश वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, १ झाला बरा !

September 22, 2021

सत्तेचा गैरवापर कसा करावा हे भाजपकडून शिकले पाहिजे : राज्यमंत्री बच्चू कडू यांची टीका

April 13, 2021

दुर्दैवी घटना : चिमुकल्या जुळ्या भाऊ-बहिणीचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू !

July 7, 2023

डॉक्टर असोशियनने केला अँड. संजय महाजनांचा सत्कार

June 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group