नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये अज्ञात व्यक्तीने आठ वर्षांच्या दोन मुलींचे कपडे उतरवल्याची (8 Year old students molested) घटना समोर आली आहे. ही शाळा दिल्लीच्या भजनपुरा (MCD School) भागातील असल्याचे त्यांनी सांगितले.
धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेबाबत मुलींनी शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सांगितले तेव्हा त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या मुलींना हे सगळं विसरून जा असं सांगितल्याचा आरोप मालिवाल यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, ‘शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली नाही, त्यामुळे त्यांच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी.’
दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना या प्रकरणी कडक कारवाई करण्याची नोटीस दिली आहे. याप्रकरणी माजी एमडीसी आयुक्तांना महिला आयोगासमोर हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. एक अज्ञात व्यक्ती शाळेत प्रवेश कशी करू शकते? शाळांमध्ये आणि परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काय झाले? असे प्रश्न महिला आयोगाने उपस्थित केले आहेत.
पोलिसांकडून तपासासाठी विशेष पथक
डीसीपी संजय सेन यांनी सांगितले, की आम्ही या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला आहे. या घटनेच्या तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या शाळेच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नव्हता. मात्र, आम्ही आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहोत. आम्ही विद्यार्थिनींचा जवाब नोंदवला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे स्केच तयार करण्यात आले आहे. याच्या मदतीने दोन संशयीतांनाही ताब्यात घेण्यात आले असल्याचे संजय यांनी सांगितले.