मुंबई (वृत्तसंस्था) एका ३० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. मुंबईच्या साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. आरोपींनी बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याचा संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं.
साकीनाका येथील खैरानी रोड परिसरातील या घटनेमुळे खळबळ माजली आहे. पीडित महिला ३० वर्षांची असल्याची माहिती मिळत आहे. महिला सध्या रुग्णालयात दाखल असून प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. मात्र यामध्ये अजून आरोपी सहभागी असावेत असा पोलिसांना संशय आहे. सध्या तपास सुरु आहे.
















