धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अनोरे येथून जवळच असलेल्या चावलखेडा शिवारात अनोरे रस्त्याला लागुन झोपडपट्टीत अवैध दारू व अवैध धंदे सुरू आहे. हे अवैध धंदे बंद करण्यात यावे, यासाठी अनोरे येथील ग्रामस्थांनी धरणगाव पोलिसांना निवेदन दिले आहे.
चावलखेडा शिवारात अनोरे रस्त्याला लागुन झोपडपट्टीत काही महिन्यांपूर्वी छापा टाकून दारू जप्त केली होती. त्यानंतर अवैध दारू काही दिवसांसाठी बंद झाली आली. परंतू त्यानंतर ‘जैसे थे’ परिस्थिती आहे. या अवैध दारू व्यवसायामुळे परिसरातील अनेक तरुण व्यसनाधीन झाल्यामुळे अनेक कुटूंब उध्वस्त होत आहेत. तरी सदर झोपडपट्टी परिसरात कारवाई करण्यात यावी. जेणे करून अवैध दारू व्यवसाय बंद होईल, अशा आशयाचे निवेदन धरणगाव येथील पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्वप्निल महाजन सरपंच अनोरे, सुरेश पाटील, हरी महाजन,भाऊसाहेब पाटील,कल्पेश महाजन,दीपक पाटील भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष,महेंद्र गायकवाड,हेमंत महाजन,यांच्या सह आदी उपस्थित होते.