नवी दिल्ली (प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसाचाराप्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून दोन तलवारी जप्त केल्या आहेत. तर या घटनेप्रकरणी अभिनेता यापूर्वी दीप सिद्धू याला पोलिसांनी अटक केलेली आहे.
मोनीच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली. यावेळी दोन तलवारी सापडल्या. पोलिसांनी तलवारी जप्त केल्या असून, आरोपी महिंदर सिंगची चौकशी पोलिसांकडून केली जात आहेत. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारात अभिनेता दीप सिद्धूबरोबरच महिंदर सिंग मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच दीप सिद्धूला अटक केली होती. त्याचबरोबर इतर आरोपींचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.