ठाणे (वृत्संस्था) उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सुरू आहे. या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातल्या मुंब्रा रेतीबंदर परिसरात संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. आता त्याच परिसरात आणखी एक मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
मुंब्रा रेतीबंदर येथे आणखी एक मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळालेल्या परिसरात दुसरा मृतदेह सापडल्याने पोलिसही चक्रावले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. आज सकाळी ११.१० च्या सुमारास मुंब्रा रेतीबंदर येथील रहिवासी सलीम अब्दुल शेख (वय-४८) यांचा मृतदेह सापडला आहे. मुंब्रा पोलीस, पालिका आणि फायर ब्रिगेडचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एटीएस तपास करत असून सचिन वाझे विरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने केला आहे. सचिन वाझे यांचा मनसुख हत्येत हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
सचिन वाझेंचा प्रथम दर्शनी हत्या प्रकरणात सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे सचिन वाझेंचा ताबा मिळावा अशी मागमी एटीएसने ठाणे न्यायालयात केली आहे. एटीएसने ४ पाणी अहवालात न्यायालयात सादर केला होता. तसंच NIA कोर्टातून सचिन वाझे यांचा ताबा मिळावा या करता ATS ने ठाणे कोर्टातून परवानगी मिळवली आहे.