धरणगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या नवीन शेती विषयक कायद्याच्या विरोधात पंजाब, हरियाणा, चंडीगढ़ यासह देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर १० दिवसापासून शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरु केले आहे. उद्या शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनाला महाविकास आघाडीने पाठींबा देत धरणगाव तालुका बंदचे आवाहन केले आहे. व्यापारी बंधुंसह नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले आहे.
केंद्र सरकार शेतकऱ्यांचा समस्या जाणून घेण्याऐवजी हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. या विरोधात पंजाब, हरियाणा, चदिंगडसह भारतातील असंख्य शेतकरी संघटना नवीन कृषि कायद्याच्या विरोधात एकवटल्या आहेत. विविध संघटनांनी ८ डिसेंबर मंगळवार रोजी ‘भारत बंद’ची हाक दिलेली आहे. या बंदला जळगांव जिल्हा महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. या बंदमध्ये शेतकरी बांधव, व्यापारी, उद्योजक, दुकानदार, टपरीधारक शेतमजूर, सर्व नागरिक यांनी एक दिवस आपले व्यवहार बंद ठेवुन सहभागी व्हा व शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड संदिप भैय्या पाटील यांनी केले आहे.