TheClearNews.Com
Friday, March 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कारांसाठी ३ मार्चपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्.मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२० करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात ३ मार्च, २०२१ पर्यंत पाठविता येणार आहेत.

१ जानेवारी, २०२० ते ३१ डिसेंबर, २०२० या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५ यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर नवीन संदेश या सदरात “स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार २०२० नियमावली व प्रवेशिका या शीर्षाखाली व “ What’s new” या सदरात “Late Yashwantrao Chavan State Literature Award २०२० Rules Book and Application Form” या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.

READ ALSO

श्वेतपत्रिकेद्वारे प्रशासकीय राजवटीचा हिशेब प्रसिद्ध करावा ; वैशाली पाटील यांचे आयुक्तांकडे मागणी

जि. प. महिला कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात ३ मार्च, २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक/प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक/ प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाटय मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५ येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य ३ मार्च, २०२१ पर्यंत पाठवावे. असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.

लेखक/प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर/पाकीटावर “स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार, २०२० साठी प्रवेशिका” असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ३ मार्च, २०२१ हा राहील. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत. असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

श्वेतपत्रिकेद्वारे प्रशासकीय राजवटीचा हिशेब प्रसिद्ध करावा ; वैशाली पाटील यांचे आयुक्तांकडे मागणी

March 5, 2026
गुन्हे

जि. प. महिला कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 5, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
Next Post

छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीचे ३४२ अर्ज प्राप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘५० टक्क्यांच्या मर्यादेसह १०२ वी घटनादुरुस्ती निरुपयोगी’ : अशोक चव्हाण

August 4, 2021

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे काळाची गरज आहे : डॉ. चंद्रमौली जोशी

July 19, 2022

आमदार अनिल पाटील यांना पितृशोक

April 17, 2021

बळीरामपेठेत प्रौढाचा अकस्मात मृत्यू, शहर पोलिसात नोंद !

February 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group