जळगाव (प्रतिनिधी) दि. १५ ऑगस्ट १९४७ ते ३० एप्रिल १९९५ च्या कालावधीत युध्दात / मोहिमेत शहीद झालेल्या सैनिकांच्या वारसांना सुवर्ण महोत्सवी योजने अंतर्गत अर्थसहाय्य पुरविणेबाबत महाराष्ट्र शासनाची योजना आहे.
या अनुषंगाने दि. १५ ऑगस्ट १९४७ ते ३० एप्रिल १९९५ च्या कालावधीत युध्दात / मोहिमेत शहीद झालेल्या जळगाव जिल्ह्यातील माजी सैनिक / माजी सैनिकांच्या वारसांनी आपलेकडे असलेले सैन्यसेवेचे कागदपत्रे सोबत घेऊन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.