TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रीडांगण विकास योजनेतंर्गत २० सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2021
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांच्याकडून उपलब्ध अनुदानातंर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगावमार्फत अनुसुचित जाती उपयोजने अंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान सन २०२१-२२ साठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत फक्त अनुसुचित जाती (एस.सी) संवर्गासाठी कार्यरत अशा सर्व शासकीय संस्था, अनुदानीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वसतीगृहे इत्यादी ज्यांना शिक्षण विभागाने/ समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे.

अशा संस्था तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका इत्यादींना त्यांच्या क्षेत्रातील अनुसुचित जाती वस्ती, वाडीसाठी उपलब्धतेनुसार अनुदान मिळणार आहे. त्यासाठी ज्या अनुदानीत शाळा, महाविद्यालय, वसतीगृहे यांच्याकडे फक्त क्रीडांगणासाठी जवळपास दीड एकर किंवा त्यापेक्षा जास्त किंवा विहित खेळांचे मैदाने तयार करण्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध आहेत ते अनुदान प्राप्तीसाठी प्रस्ताव करु शकतील.

READ ALSO

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

या योजनेतंर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, २०० मी. अथवा ४०० मी. धावनमार्ग तयार करणे, क्रीडांगणास भिंतींचे/तारेचे कुपन घालणे, विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह/चेजींग रुम बांधणे, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर फ्लड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा/सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी/आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरीवर/आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे, निर्मित सुविधा विचारात घेवून मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे व मैदानावर रोलींग करण्यासाठी मिनी रोलर खरेदी करणे इत्यादीं बाबींसाठी क्रीडा उपक्रमांची आवश्यता असल्याची खात्री केल्यानंतर अनुदान मंजूर करण्यात येते.

याबाबींपैकी कोणत्याही एका बाबीसाठीच एक वर्षात अनुदान उपलब्धतेनुसार अनुदान मंजूर करण्यात येईल. उल्लेख केलेल्या प्रत्येक बाबींकरीता (प्रस्ताव एकाच बाबींकरिता करावा) अंदाजीत खर्चाच्या १०० टक्के किंवा कमाल ७ लाख रुपया पर्यंतचे अनुदान यापैकी जी रक्कम कमी असेल इतकी रक्कम अनुदान म्हणुन देण्यात येईल. मात्र क्रीडा साहीत्यासाठी कमाल अनुदान मर्यादा ३ लाख रुपये इतकी राहील. क्रीडासाहित्य मागणी प्रस्तावांसाठी शाळा/महाविद्यालय/वसतीगृहे यांच्याकडे मैदाने/हॉल उपलब्ध असणे आवश्यक आहे.

अनुसुचित जाती उपयोजनेतंर्गत सन २०२१-२२ या वर्षासाठी अनुदान मागणीचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे. तरी या योजनेचा लाभ/फायदा घेवू इच्छिणाऱ्या फक्त अनुसुचित जाती (एस.सी) संवर्गासाठी कार्यरत शासकीय संस्था, अनुदानीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वसतीगृहे इत्यादी, ज्यांना शिक्षण विभागाने/ समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी अनुदान मागणीचे प्रस्ताव सादर करावे. अर्जाचा विहित नमुना व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे दि. २० सप्टेंबर, २०२१ पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. परिपूर्ण प्रस्ताव हा ऑनलाईन jalgaonsports.in या वेबसाईटवर अपलोड करुन अपलोड केलेल्या प्रस्तावाची प्रिंट काढून ती प्रत व मुळ कागदपत्र असलेला प्रस्ताव असे दोन प्रतीत प्रस्ताव अर्जासोबत असलेल्या यादीनुसार योग्य त्या कागदपत्राच्या पूर्ततेसह सादर करावेत. विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

लोकशाही दिनात प्राप्त तक्रार प्रलंबित राहिल्यास कार्यालयप्रमुख जबाबदार : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन राज्यस्तरीय बैठक संपन्न

July 2, 2021

गौरव भोळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

October 13, 2021

जामनेर कॉम्प्लेक्स घोटाळ्याप्रकरणी ॲड. विजय पाटील यांनी घेतली समितीची भेट ; तास भर चर्चा, विविध कागदपत्र केली सादर !

April 16, 2021

‘लज्जास्पद, ही शुद्ध फसवणूक’ ; इंधन कपातीवरून फडणवीसांची ठाकरे सरकरवर टीका

May 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group