जळगाव (प्रतिनिधी) येथील रहिवासी व मनसे चे निष्ठावंत सैनिक दिलीप सुरवाडे यांची जळगाव शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मनसेचे निरीक्षक व राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे (मुंबई) यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे,जिल्हाध्यक्ष अनिल वाघ, जिल्हाध्यक्ष कमलाकर घारु, जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे, महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, उपशहरअध्यक्ष आशीष सपकाळे, रस्ते आस्थापना जिल्हा संघटक राजेंद्र निकम,साजन पाटील,ललित शर्मा उपस्थित होते. दरम्यान विनय भोईटे यांच्या अध्यक्षते त्याखाली जळगाव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली व पक्ष बांधणी, आगामी निवडणुका याबाबत आढावा घेण्यात आला.