जळगाव (प्रतिनिधी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व पक्षाचे जळगाव जिल्हा निरीक्षक तथा राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे यांनी आज जळगाव महानगर अध्यक्षपदी किरण तळेले व विनोद शिंदे यांची नियुक्ती केली आहे.
तसेच अश्विन भोळे व आशिष सपकाळे यांची उपमहानगरअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे, अनिल वाघ, कमलाकर घारू, अविनाश पाटील, साजन पाटील आदी उपस्थित होते.