जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी योगेश देसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील,प्रदेश सरचिटणीस रवींद्र नाना पाटील,रावेर जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, चाळीसगाव ता.अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, गोकुळ पाटील आदी उपस्थित होते.