TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘वाझेंनी गोस्वामींना अटक केली म्हणून राग आहे का?’ : गृहमंत्री अनिल देशमुख

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) विरोधकांकडून सचिन वाझे यांचं नाव या प्रकरणात सातत्याने येत आहे यावर आता गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. ‘सचिन वाझे आता या प्रकरणाचा तपास करत नसून पीएसआय नितीन अलंकुरे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. सचिन वाझेंनी अर्णब गोस्वामींना अटक केली म्हणून तुमचा त्यांच्यावर राग आहे का?, असा सवाल गृहमंत्र्यानी विरोधकांना केला आहे. गृहमंत्र्यांच्या या प्रश्नांवर सभागृहात काही काळासाठी गदारोळही झाला.

उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी २५ फेब्रुवारीला सापडली होती. २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १ वाजता अंबानी यांच्या घराजवळ ही कार ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही कार पोलिसांच्या निदर्शास आली होती. ही घटना उघडकीस येताच या घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिट कडे देण्यात आला होता. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युमुळे आज विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी काळंबेरं असल्याचं सांगत, मनसुख हिरेन आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात फोनवरुन संवाद होत असल्याचा दावा केला. सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामींना अटक केली म्हणून तुमचा त्यांच्यावर राग आहे का, असा प्रतिसवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

विरोधकांकडून सचिन वाझे यांचं नाव या प्रकरणात सातत्याने येत आहे यावरही गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. ‘सचिन वाझे आता या प्रकरणाचा तपास करत नसून पीएसआय नितीन अलंकुरे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. सचिन वाझेंनी अर्णब गोस्वामींना अटक केली म्हणून तुमचा त्यांच्यावर राग आहे का?, असा सवालही गृहमंत्र्यानी विरोधकांना केला आहे. अन्वय नाईक प्रकरणी सचिन वाझेंनी अर्णब गोस्वामींवर कारवाई केली होती,’ असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणावर निवेदन देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं की, “स्कॉर्पिओ गाडीचे मूळ मालक सॅम पीटर न्यूटन होते. त्यांनी इंटिरिअरसाठी दिली होती. पैसे दिले नाहीत म्हणून ही गाडी मनसुख हिरेन यांच्या ताब्यात होती. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर इथे सापडला, त्यांच्या शरीरावर कोणतीही दुखापत नव्हती. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण समजेल. ठाणे पोलीस याचा तपास करत आहेत.”

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्यात फोनवरुन संवाद : देवेंद्र फडणवीस

मनसुख हिरेन यांनी जबाबात म्हटलं आहे की, घरगुती वापराकरता ती मी गाडी विकत घेतली. त्याचं स्टेअरिंग जॅम झालं, त्यानंतर ते क्रॉफर्ड मार्केटला जाऊन भेटले. कोणाला भेटले? सचिन वाझे आणि त्यांचे टेलिफोन संवाद होते. जो या प्रकरणातला दुवा होता, त्याची बॉडी सापडली आहे. मी मृतदेह पाहिला, हात मागे बांधले आहेत असं कोणी आत्महत्या करत नाही. इतके योगायोग होत नाहीत. तात्काळ हे प्रकरण एनआयएकडे दिलं पाहिजे, असं यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच गृहमंत्री यांच्या बोलण्यात आणि पोलीस जबाबात तफावत असल्याचं सांगत कोणी पोहोचायच्या आत सचिन वाझे कसे पोहोचले? क्रॉफर्ड मार्केटला भेटलेला व्यक्ती कोण? असे प्रश्न उपस्थित केले.

खालच्या स्तरावर जाऊन गृहमंत्र्यांचं उत्तर

गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. “इतक्या खालच्या स्तरावर जाऊन उत्तर देणं हे गृहमंत्र्यांना न शोभणारं. कोणतीही उत्तरं नसल्यावर अशी वक्तव्ये केली जातात. एक गोष्ट लक्षात आली की आम्ही इतके पुरावे दिले की गृहमंत्री निरुत्तर झाले. त्यांनी भटकवण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न सपशेल अयशस्वी झाला आहे,” असं देशमुख म्हणाले.

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

बिग ब्रेकिंग : जीएसटी घोटाळा १०० कोटीच्या घरात ; मुख्य सूत्रधार जळगावचा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिक्षण नसेल तरी मिळेल वायुसेना विद्यालय नागपूर येथे नोकरीची संधी ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती !

February 8, 2022

कासोद्यात बंद घर फोडले ; २ लाख ४० हजाराची रोकड लंपास !

October 29, 2022

अमळनेर तालुक्यात अंगावर वीज पडून मजूर ठार ; पत्नी, सासू आणि दोन मुले जखमी !

October 7, 2022

चाळीसगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभीकरण व नूतनीकरण शुभारंभ

October 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group