धरणगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल अपमानजनक व धमकी देणारे व्यक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवुन त्वरीत अटक करण्यात यावी, अशी मागणी धरणगाव भाजपच्यावतीने आज पोलिसांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, वाचाळवीर नाना पटोले यांनी काल भंडाऱ्या जिल्ह्यातील एका निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान मी मोदींना मारु शकतो व मी मोदींना शिव्या देऊ शकतो असे बेताल वक्तव्य करून आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान केलेला नाही तर एक प्रकारे प्रतप्रधान यांना धमकी देणारे व्यक्तव्य केले यावरून काँग्रेसची मोदीजीं बद्दलची शत्रुत्वाची भावना स्पष्ट होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही भाजपा व ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी सदर निवेदना मार्फत मागणी करतो की असे बेताल वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्या विरुध्द त्वतरी फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुक्याच्या वतीने तिव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा याद्वारे देण्यात आला आहे.