नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसारखाच दिसणारा गुन्हेगार त्याच्याच आसपास कुठेतरी राहात होता. याचा मोठा फटका एका निर्दोष व्यक्तीला बसला आहे. कोणताही गुन्हा केलेला नसताना त्याला ३ दिवसात ५ वेळा अटक झाली आहे. याच कारण असं की, या व्यक्तीचा चेहरा परिसरातील गुन्हेगारासोबत मिळताजुळता होता. त्यामुळे त्याला ५ वेळा अटक झाली.
ऑक्टोबर २०२१ मध्ये ही अजब घटना घडली. जिलिन येथील पोलिसांनी एकाच व्यक्तीला तीन दिवसाच्या आत पाच वेळा अटक केली आणि सोडून दिलं. या व्यक्तीचा चेहरा परिसरातील गुन्हेगार ज्यू शियानजियान याच्यासोबत मिळताजुळता होता. जो सध्या जेलमधून फरार आहे. अशात पोलिसांना त्याचा पत्ता देणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींनी पाचवेळा त्याच व्यक्तीचा पत्ता दिला, ज्याचा चेहरा गुन्हेगारासोबत जवळपास हुबेहूब मिळताजुळता होता. फरार आरोपीचा पत्ता सांगणाऱ्या बक्षीस मिळणार होतं. त्यामुळे बक्षीसाठी सगळेच पोलिसांना गुन्हेगारासारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीचा पत्ता देत होते आणि पोलिसांनीही त्याला पाचवेळा अटक केली. कोणताही गुन्हा नसताना पोलिसांनी या आरोपीला वारंवार शोधून पकडलं.
ज्यू शियानजियान तुरुंगातून पसार झाल्यावर त्याचे फोटो संपूर्ण परिसरात लावण्यात आले होते. या बिचाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यापासून त्याचा हेअरकटही हुबेहूब गुन्हेगार असलेल्या व्यक्तीसारखाच आहे. यामुळे पोलिसांचीही गफलत झाली. हा गोंधळ तेव्हापर्यंत सुरूच राहिला जोपर्यंत २८ नोव्हेंबरला खरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात सापडला नाही. मात्र तोपर्यंत ही कथा सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनेलवर हीट झाली होती. लोकांनी निर्दोष व्यक्तीला सल्ला दिला की पुढच्या वेळी आयडी कार्ड गळ्यात घालूनच घराबाहेर पड, जेणेकरून लोकांचा गोंधळ उडणार नाही.