अकोला (प्रतिनिधी) पातूर येथे कुरिअर सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांने येथील ढाब्यावर उभ्या असलेल्या लक्झरी बसमधून ८० लाख रुपये चोरी गेल्याची घटना . २६ नोव्हेंबर रोजी ही रात्री घडली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मध्य प्रदेशातील एका आरोपीला अटक करत केली असून ७९ लाखांची रोकड हस्तगतही केली.
राजापेठ अमरावती येथील राजू वेलाजी प्रजापती (वय २६) यांची अज्ञात चोरट्याने ८० लाख रुपये असलेली बॅग लंपास केली होती. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्याकडे सोपवला होता. पो.नि. शेळके यांच्या मार्गदर्शनात एपीआय कैलास डी. भगत, पीएसआय गोपाल जाधव हे गुन्ह्याचा तपासाठी मध्य प्रदेशात गेले होते. त्यांनी ग्राम खेखा, ता. मनवार, जि. धार येथील आरोपी विनोद विश्राम चव्हाण (१९, रा. लुन्हेरा बुजुर्ग, ता. मनावर, जि.धार) यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून रोख रक्कम ७९ लाख रुपये जप्त केले. त्याचा साथीदार रहेमान ऊर्फ पवली गफूर खान हा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला. शंकर शेळकेंच्या मार्गदर्शनात सहा, निरीक्षक कैलास भगत, उपनिरीक्षक गोपाल जाधव, कॉन्स्टेबल गणेश पांडे, राजपालसिंह ठाकूर, रवींद्र खंडारे, महेंद्र मलिये, अब्दुल माजीद, विशाल मोरे, एजाज अहेमद, वसीमोद्दिन शेख, अविनाश पाचपोर, भीमराव दीपके, स्वप्नील चौधरी, राहुल गायकवाड, अन्सार शेख, मो, आमीर, लिलाधर खंडारे, खुशाल नेमाडे, चालक अक्षय बोबडे, प्रवीण कश्यप, प्रशांत कमलाकर, अनील राठोड यांनी केली.