मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी गेल्या २० दिवसांपासून कोठडीत असलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन अर्जावर आज मुंबई कोर्टात जोरदार सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला असून सुनावणी उद्यावर ढकलली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मनिष राजेगरिया यांनी जामीन मंजूर झाला आहे.
यावेळी भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू मांडली. कोर्टात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे सुनावणीसाठी अडथळा आला होता. न्यायमूर्तीला सुनावणी थांबवावी लागली होती. त्यानंतर पोलिसांनी कोर्टातली गर्दी कमी केली. त्यानंतर सुनावणीला सुरुवात झाली. वरीष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानच्या बाजू मांडत जोरदार युक्तीवाद केला.
आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्ज घेतलेले कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीने अधिकाऱ्यांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले. त्याची वैद्यकीय चाचणीदेखील केली नाही. अरबाजच्या बुटात काही प्रमाणात ड्रग्ज सापडलं असा युक्तीवाद आर्यन खानचे वकील माजी अॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी केला.
दरम्यान आर्यनच्या जामिनाला एनसीबीचा विरोध केला होता. गुणवत्तेच्या आधारावर आर्यनच्या जामिनाची याचिका फेटाळून लावण्याची एनसीबीच्या वकिलांनी मागणी केली होती. तपासाच्या या टप्प्यावर जामीन दिल्यास खटल्यावर थेट परिणाम होईल असा दावा एनसीबीच्या वतीनं करण्यात आला होता. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल फुटला आहे, त्यामुळे प्रभाकर साईल यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची न्यायालयानं दखल घेऊ नये अशी विनंती एनसीबीच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केली होती.















