मुंबई (वृत्तसंस्था) क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर आर्यन खानसह मूनमून धमेचा तसेच अरबाज मर्चंट यांना तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे. दरम्यान, आता त्याच्या वकिलाला जामिनासाठी सत्र न्यायालयात जावे लागेल.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला शुक्रवारी ड्रग्ज प्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला नाही. यासह अन्य दोन आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळले आहेत. आर्यन खानच्या वकीलांना आता जामीनासाठी सेशन कोर्टात अर्ज करावा लागणार आहे. सेशन कोर्टात अर्ज केल्यानंतर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्यनला आजची रात्र आर्थर रोड कारागृहात काढावी लागणार आहे.
मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खान आणि सात इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आर्यन खानला कोठडी दिल्यानंतर आर्यन खानसह आठही जणांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता.