धरणगाव – ( प्रतिनिधी ) संपूर्ण महाराष्ट्रात रविवारी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पी.आर. हायस्कूल मधील बाल वारकऱ्यांनी दिंडी काढून विठू नामाचा जयघोष केला. टाळ, मृदंगाच्या गजरात शहरातून दिंडी काढण्यात आली. मुख्याध्यापक मेजर डी. एस. पाटील , पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कोळी , ज्येष्ठ शिक्षक डॉ. बापू शिरसाठ यांनी पालखीत ठेवलेल्या ज्ञानोबा, नामदेव आणि तुकाराम यांच्या गाथांचे पूजन करून दिंडीला सुरुवात केली. शहरातील परिहार चौकातून मेन रोड,श्रीराम मंदिर, विठ्ठल मंदिर मार्गे कोट बाजार, धरणी चौक, पिल्लू मशीद ,अहिल्यादेवी होळकर चौक मार्गे पालखी मिरवणूक विद्यालयात आली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी , संत एकनाथ , संत नामदेव , संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई ,संत मुक्ताबाई यांची वेशभूषा केली होती. विद्यार्थी व विद्यार्थिनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून कार्यक्रमास उपस्थित होते. ठीक ठिकाणी रांगोळ्या काढून ,फुलांचा वर्षाव करून नागरिकांनी पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले. विद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिक्षक गोपाल चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी महात्म्य व विठ्ठल भक्तीची महती सोदाहरण स्पष्ट केली.
यावेळी नवनीत सपकाळे, गणेश सूर्यवंशी, संदीप घुगे, प्रदीप असोदेकर ,राजेश खैरे, गोपाल चौधरी, सूरेंद्र सोनार ,नंदू पाटील, संजय बेलदार, डॉ. वैशाली गालापुरे, मोहन पाटील, योगेश नाईक, मिलिंद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे यांनी सहकार्य केले.














