जळगाव (प्रतिनिधी) शहरातील त्र्यंबक नगर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत आषाढी एकादशी निमित्त समता नगर परिसरात पायी दिंडी काढण्यात आली.
यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांच्या हस्ते माऊलीचे प्रतिमापूजन व आरती करण्यात आली. यावेळी शिक्षक वारकरी पेहरावात होते. तर याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल भोळे, सचिव सविता भोळे, सदस्य योगेश झांबरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन निलेश मोरे यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापक संजय भोळे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.